सोलापूर : मध्य प्रदेशातील पहाडखेडा या गावी दुर्गा महोत्सव मोठा उत्साह अन् भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत असून सतना जिल्ह्यातील पहाडखेडा या गावातील दुर्गा उत्सवाच्या पूजेचा मान संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम व जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले यांना मिळाला. महाराष्ट्रातील महिलांच्या अंगात येण्याचे प्रमाण असते तर मध्य प्रदेश मध्ये कोणत्याच महिलेच्या अंगात येत नाही, हे निरीक्षण श्याम कदम यांनी नोंदविलं आहे.
महाराष्ट्रातील नवरात्र उत्सवात महिलांच्या अंगात येण्याचे प्रमाण असते. मध्य प्रदेशात कोणत्याच महिलेच्या अंगात येत नाही, त्या ठिकाणी जास्तीत जास्त पुरुषांच्याच अंगात येत असल्याचे दिसून आले.
ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या भक्तीभावाने या उत्सवामध्ये सामील झालेले होते. यावेळी भजनाचे आयोजन करण्यात आलं होतं, असेही कदम यांनी सांगितले.