विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून गायक मोहम्मद अयाज यांचा कौतुक

shivrajya patra
मुंबई :  'आवाज महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात दूरचित्रवाणीवर तुमची गाणी आम्हाला आनंद देऊन गेली, आपण यापुढे देखील आपल्या संगीताच्या माध्यमातून सेवा करीत राहावे. तुमच्या कलेची दखल नक्की घेतली जाईल, असं प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई यार्न मर्चंट असोसिएशनच्या कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहंम्मद अयाज यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. 

या वेळी कार्यक्रमाचा प्रारंभ 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताने करण्यात आला. यावेळी मोहम्मद अयाज वेगवेगळ्या प्रकारची अनेक गीते गाऊन उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. 

मी सामान्य शेतकरी कुटुंबातील कलावंत आपल्या सोलापूर मंद्रुप गांवाचं नाव जगभरात लौकीक केला, मान-सन्मान मिळाला, या सन्मानाची परतफेड मी माझ्या कलेच्या माध्यमातून नक्कीच करेन. ही एक कौतुकाची थाप मला ऊर्जा देऊन जाते, अशी भावना मोहम्मद अयाज यांनी यावेळी व्यक्त केली. ‌

यावेळी बाॅम्बे यार्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर जयकृष्णा पाठक , मुंबई कमिशनर राधेश्याम शर्मा ( GST ) असोसिएशन चे सेक्रेटरी सोमाणी, यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्रात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, जयकृष्ण पाठक आणि गायक मोहंम्मद अयाज दिसत आहेत.
To Top