महार रेजिमेंटचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा रेजिमेंटमधून निवृत्त झालेल्या सैनिकांचाही सत्कार

shivrajya patra
कासेगांव/ संजय पवार : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या महार रेजिमेंटचा ८३ वा  स्थापना दिवस, ०१ ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर समता सैनिक दल, शाक्य संघ आणि सिदनाक ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महार रेजिमेंटमधून निवृत्त झालेल्या मेजर सुभेदार, नाईक आणि सैनिकांचा सत्कार करण्यात आला. 
प्रारंभी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि देशासाठी लढलेल्या महार रेजिमेंट मधील शूर वीर सैनिकांना मानवंदना देण्यात आली. यावेळी निवृत्त पोलीस उपअधीक्षक विजयकुमार परकाळे, समता सैनिक दलाचे जी ओ सी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरु जाधव, शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके, सिदनाक ब्रिगेडचे प्रमुख नाईक जयानंद कांबळे यांच्याहस्ते उपस्थित सर्व सैनिकांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी समता सैनिक दलाचे महासचिव अनिल जगझाप, प्राचार्य वसिष्ठ सोनकांबळे, चित्तरंजन सातपुते, विकी जाधव, अंकुश बनसोडे, बापू गायकवाड, महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष सुमित्रा जाधव, भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष राजश्री गायकवाड, प्रिपोवेल, प्रज्वल डोळसे, शिवाजी भंडारे, कांता सुरवसे, सुमन गाडे, विक्रांत दुपारगुडे, शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेखर वाघमारे, मिलिंद कोरे, गोपीनाथ कांबळे, ईश्वर मसलखांब, अशोक सोनवणे, के. पी. सुरवसे, नाना गाडे, हजारे आण्णा यांच्यासह ५० निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महार रेजिमेंटचे सत्कारमूर्ती सैनिक- नाईक जयानंद कांबळे, कमलाकर कांबळे, रामचंद्र माशाळे, भाऊसाहेब वंजारी, विद्याधर ढोणे, संगप्पा शिंदे, सूर्यकांत गजधाने, गणेश कांबळे, चंद्रकांत बनसोडे, विष्णू वाघमारे, प्रमोद जाधव, सुरेश खरसुदे, शिवाजी गायकवाड, शंभुदेव सुरवसे, शिवाजी सुरवसे, शहाजी देडे, महेश गायकवाड, गुंडू केंगार, मधुकर माने, सत्यवान वाघमारे, सदाशिव पट्टद, राहुल साबळे, पंडित व्हनमाणे, सुरेश गेजगे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी निवृत्त पोलीस अधीक्षक विजयकुमार परकाळे, अण्णासाहेब भालशंकर, केरु जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जयानंद कांबळे यांनी केले,    सूत्रसंचालन प्राचार्य वसिष्ठ सोनकांबळे यांनी तर आभार अनिल जगझाप यांनी मानले.
To Top