सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, टोळी मालक, वाहन मालक हांच्या नावावर बनावट कागदपत्रे व खोट्या सह्या करून राष्ट्रीयकृत बँकातून परस्पर
करोडो रुपयाचे कर्ज काढले. याप्रश्नी प्रशासन न्याय देत नाही अन् बापू कर्जाची परतफेड नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष तथा कार्यलयीन सरचिटणीस महेश नागनाथ माने यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मंगळवारी, 2 ऑक्टोबर रोजी त्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
त्या बहुचर्चित कर्ज प्रकरणी आजपर्यत ऊस उत्पादक शेतकरी, टोळी मालक, वाहन मालक यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी कर्ज काढल्याचा व त्याची परतफेड न केल्याचा महेश माने यांची तक्रार आहे. या प्रश्नी प्रशासन न्याय देत नसल्याच्या निषेधार्थ होटगी रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानासमोर मंगळवारी, सकाळी १०.३० वा. आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा महेश माने यांनी दिला आहे.