सोलापूर : येथील ओंकार यशवंत सुतार याची जर्मनीतील टी.यु. बर्लीन विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. नुकताच तो जर्मनीला रवाना झाला. `इंटरनॅशनल मास्टर प्रोग्राम इन ग्लोबल प्रोडक्शन इंजिनियरिंग` या विषयामध्ये तो तिथे उच्चशिक्षण घेणार आहे.
ओंकारचे शालेय शिक्षण जुळे सोलापुरातील आयएमएस विद्यालयातून झाले. उच्च माध्यमिक शिक्षण ए.डी.जोशी कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेतून झाले. एन.के. अॅार्चिड कॅालेज अॅाफ इंजिनियरिंग, सोलापूर येथून त्याने मेकॅनिकल इंजियनियरिंगची पदवी मिळवली.
गेल्या दोन वर्षापासून तो पुण्यातील अॅक्सेंचर कंपनी येथे कार्यरत होता. ओंकारच्या निवडीबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.