दांडिया स्पर्धेत 'हिरकणी' चा प्रथम क्रमांक लोकमंगलच्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद

shivrajya patra
सोलापूर : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त लोकमंगल समूहाच्यावतीने आयोजित दांडिया उत्सवात युवक-युवती दांडियाच्या तालावर थिरकली. पारंपारिक वेशभुषेतील युवती व महिला मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जुळे सोलापुरात आयोजित या दांडिया स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत लाखो रुपयांच्या बक्षिसांची लय लूट करण्यात आली. हिरकणी ग्रुपने प्रथम क्रमांकाचे २१ हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले.

लोकमंगल समूहाच्या वतीने यंदा पहिल्यांदाच शनिवारी जुळे सोलापुरातील भंडारी स्पोर्ट्स ग्राउंडवर दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील युवतींमध्ये उत्साह संचारला होत. नॉनस्टॉप म्युझिक लाईट, डीजेने या स्पर्धेमध्ये रंगत आणली होती. पारंपारिक वेशभूषेत महिला व युवक-युवतींनी ग्रुप दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. फटाक्यांची आतिषबाजी आणि लेझर शोने तर या स्पर्धेत आणखी रंगत आणली.

स्पर्धेत दांडिया, गरबासाठी सोलो डूएट दांडिया, जनरल दांडिया असे गट होते. सर्व प्रकारच्या गटामध्ये महिला आणि युतीने बहारदार नृत्य सादर करून संपूर्ण स्पर्धेत रंगत आणली होती. ग्रुप गरबामध्ये हिरकणी ग्रुपला प्रथम क्रमांकाचे २१ हजारांचे पारितोषिक मिळाले. नृत्यकला ग्रुपला द्वितीय क्रमांकाचे १५ हजार तर रेणुका माता ग्रुपला तृतिय क्रमांकाचे ११ हजारांची पारितोषिक आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. त्याचबरोबर बेस्ट ड्रेस व बेस्ट फॅमिली परफॉर्मन्स, बेस्ट सोलो डान्स सह विविध प्रकारात मिळून सुमारे दीड लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली याशिवाय वस्तू स्वरूपातही महिलांना बक्षीस देण्यात आली.

कार्यक्रमाला आमदार सुभाष देशमुख यांच्यासह प्रादेशिक उपसंचालक क्षमा पवार, वैद्यकीय अधिकारी आग्रजा चिटणीस विशाला दिवाणजी, मनीषा मिसाळ, डॉ. योगिनी घाटे, मनीष देशमुख, स्मिता देशमुख, अवंती देशमुख, स्वाती वैद्य, अरुणा देवडीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
To Top