कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांना स्मृतिदिनी अभिवादन

shivrajya patra

सोलापूर : गेल्या वर्षभरात देशात व राज्यात  कर्तव्य बजावित असताना जे पोलीस अधिकारी व अंमलदार शहीद झाले आहेत, त्यांचे स्मरण करण्याकरीता पोलीस मुख्यालय सोलापूर शहर येथे शहीद दिनानिमित्त शनिवारी, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. 

या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मो. सलमान आझमी, पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १० सोलापूर समादेशक विजयकुमार चव्हाण, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूरच्या प्राचार्य डॉ. वैशाली कडुकर व अन्य पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरीक उपस्थित होते.
To Top