' वाघनखे' च्या सरकार विरूध्द इतिहास संशोधक वादात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उडी

shivrajya patra
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणत असल्याचा गाजावाजा शिंदे-भाजप सरकारनं केला आहे. पण ही वाघनखं महाराजांची नसल्याचा दावा आता इतिहास संशोधक संदर्भानिशी करतायत. सरकार विरूध्द इतिहास संशोधक या वादात आता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उडी घेतलीय. 'तुम्ही म्हणताय, त्याप्रमाणे खरंच ती वाघनखं शिवाजी महाराजांची असतील, तर मग ती भाड्याने का आणताय?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या संदर्भातील कोणतीही गोष्ट महाराष्ट्रासाठी भूषणावह तसेच पवित्र आहे. पण महाराजांची वाघनखं असल्याचं दाखवून शिंदे-भाजप सरकार काहीही खपवणार असेल आणि महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणार असेल तर ते कदापि खपवून घेतलं जाणार नाही, असं उध्दव बाळासाहेब ठाकरे 
शिवसेनेने म्हटलं आहे.

ही वाघनखं खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची असतील तर त्याचे तसे रेकॉर्ड लंडनच्या म्युझियममध्ये का नाहीत ? तुम्ही म्हणताय, त्याप्रमाणे खरंच ती वाघनखं शिवाजी महाराजांची असतील, तर मग ती भाड्याने का आणताय ? असा ठाकरे शिवसेनेचा सवाल असून त्यावर सरकारच्या वतीने जे उत्तर येईल, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
To Top