सोलापूर : येथील अक्कलकोट रोडवरील अक्षय ग्रॅन्ड येथे दोन दिवसीय गरबा व दांडिया कार्यक्रमात तेलुगु सिनेअभिनेत्री आरोही हिच्या उपस्थितीत महिला व मुलामुलींनी बहारदार गरबा, दांडीयासह ब्रतुकम्मा ब्रतुकम्मा उय्यालोच्या गाण्यावर फेर धरून जल्लोष केला. स्नेहारिका ग्रुप प्रस्तुत पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघम, पद्मशाली युवक संघटना, हरिओम विणकर बाग बहुउद्देशीय संस्था व अक्षय ग्रॅन्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्य प्रायोजक अजय बुरा आणि तेलुगु अभिनेत्री आरोही व पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष महेश कोठे, सरचिटणीस गणेश पेनगोंडा, यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व सौ.जयदेवी संदीप कारंजे, भाजपाचे शहर सरचिटणीस पांडुरंग दिड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवसीय गरबा व दांडिया कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संघमचे अध्यक्ष सुधाकर गुंडेली, अशोक चौक जय माता दी नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष सिताराम महाकांळ, बिल्डर सुरेश मिठ्ठाकोल, संतोष गड्डम, चाटला पैठणी, डॉ.विजय देगांवकर, पद्मकमळ प्रतिष्ठानचे गोपीकृष्ण वड्डेपल्ली, अदिती एंटरप्रायझेस, चंद्रोदय विव्हिंग मिल, अजय पोन्नम सर, स्पीड कलेक्शनचे बाकळे, श्रीकांत फोटो स्टुडिओ, हरिप्रिया सारीज, उदगिरी एलआयसी एजंट, सागर मेडीकलचे किरण पामू, पुर्वा डिस्टयुब्युटर्सचे संचालक श्रीधर वडनाल, वेदांत फॅब्रिक्सचे राहूल गोली, उद्योजक अंबादास बिंगी, लड्डू मादास, दयानंद मामड्याल, सौ.रेणुका बुधारम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी रूद्रनेत्री, इंदू ना सेल्फी, भले भले चित्रम, सिक्रेट राज्यम, कोत्ता ना प्रणायम,व नुव्वू नेन्नू, मल्लेश्वरी, जेम्स बाँड या मालिकांमध्ये भूमिका केलेल्या आरोही या अभिनेत्रींचे सत्कार पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघमचे अध्यक्ष माधवी अंदे, सचिवा विद्या सिंगम, उपाध्यक्षा प्रभावती मद्दा यांच्या हस्ते चाटला पैठणी साडी परिधान करून करण्यात आला, तर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का, हरिओम विणकर बाग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत दंडी, मल्लिकार्जुन अरकाल सचिव प्रकाश पुल्ली यांच्या हस्ते शाल पांघरून सन्मान करण्यात आला.
गरबा व दांडिया कार्यक्रम यशस्वीतेसाठी पद्मशाली युवक संघटना, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघम, हरिओमचे पदाधिकारीसह मनोहर माचर्ला, कुमारगौरव कुडक्याल, श्रीकांत दासरी, आकाश अंबाल, नयन दोंता, किरण अंबाल, नवल दोंता व परिक्षक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऐश्वर्या हिबारे हिनं केलं.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्षय ग्रॅन्डचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर अंबाल, समन्वयक व्यंकटेश दोंता यांनी विशेष परिश्रम घेतले.