... उर्वरित क्षेत्रात अतिक्रमण करु पाहणाऱ्या शेतकऱ्याविरुद्ध न्याय मिळेपर्यंत बैठा सत्याग्रह

shivrajya patra

सोलापूर : बहिणींच्या हिश्याची शेतजमीन खरेदी घेतलेले समीर शिवाजी चव्हाण यांनी खरेदी घेतलेल्या जमिनीची मोजणी न करता, उर्वरित क्षेत्रात अतिक्रमण करु पाहत असल्याच्या निषेधार्थ टाकळी सिकंदर येथील श्रीमती मंगल दिगंबर शेटे यांनी मंगळवारी, ०३ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर न्याय मिळेपर्यंत बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील लोभाजी शेटे यांच्या वारस म्हणून त्यांच्या ५ मुलींच्या नावाची नोंद आहे. त्यांनी वारसा हक्काने धारण केलेली क्र. ८८/१/व/१/अ या मधील १.९६ हेक्टर जमीन कल्पना दळवी, राजश्री गोरे, मनिषा लोखंडे आणि शोभा हिल्लाळ यांच्या हिश्याची जमीन समिर शिवाजी चव्हाण यांना खरेदी दिली.

खरेदीदार समीर चव्हाण हे लेबर ऑफिसर असून, त्यांच्या सौभाग्यवती फॉरेस्ट ऑफिसर आहेत. त्यांनी खरेदी घेतलेले क्षेत्र न मोजता मंगल दिगंबर शेटे यांचेही क्षेत्र ते अनाधिकाराने वहिवाटत आहेत. त्यास कंटाळून अल्पशिक्षित मंगल शेटे यांनी मोहोळ तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा केला, मात्र त्यांना न्याय न मिळाल्याने सर्वच बहिणींनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.

या बैठा सत्याग्रह आंदोलनात आमच्या प्रकृतीचं काही भले- बुरं झाल्यास त्यास सर्वस्वी शासन जबाबदार असेल असं बैठा सत्याग्रह करीत असलेल्या सर्व भगिनींनी म्हटले आहे.


To Top