सोलापूर : कत्तलखाने बंद करुन देशातील 'पशू धन' जतन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी रयत राज्यम् स्वराज्यम् प्रतिष्ठान, महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष विनायक पवार यांनी महात्मा गांधी जयंतीदिनी सोमवारी, ०२ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांच्या सहकाऱ्यांसह बेमुदत चक्री उपोषण सत्याग्रहाला प्रारंभ केला.
महात्मा गांधी जयंती निमित "बेमुदत चक्री उपोषण सत्याग्रह" केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त विरोधात यांच्या अमानवी धोरणाविरुद्ध आहे. पशू धन जतन झालं तर कृषिप्रधान देशाची ओळख कायम राहणार आहे. गो आणि गोवंश हत्त्या, म्हैस-रेडाहत्त्या बंद करा, कत्तलखाने बंद करा, या मागण्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या यांत्रिक कत्तलखान्यामध्ये रोज ८३५ मुक्या प्राण्यांची पशूहत्त्या केली जाते. हे बंद करण्यात यावे, यासाठी रयत राज्यम् स्वराज्यम् प्रतिष्ठान, महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष विनायक पवार हे चक्री उपोषण सत्याग्रहाला बसले आहेत.
उपोषणामध्ये अॅड. पुनम राऊत, सचिव रवीकांत शिरगीरे, संघटक श्रीनिवास शावणे व सहसचिव बसवराज हावडे यांच्यासह रयत राज्यम् स्वराज्यम् प्रतिष्ठान, महाराष्ट्र व मित्र परिवाराचा सहभाग आहे. आदित्य मुदगल हे कार्य यशस्वी करण्यासाठी परिश्रम करत आहेत. अनेक सामाजिक संघटनांनी या बेमुदत चक्री सत्याग्रहाला जाहिर पाठिंबा असल्याची पत्रं दिली असल्याचे विनायक शिवाजी पवार यांनी सांगितले.