'त्या' कंपनी व शोरूम मॅनेजरवर ॲट्रॉसिटी अॅक्टनुसार व्हावा गुन्हा दाखल : प्रा. डॉ. ज्योती वाघमारे

shivrajya patra
सोलापूर : पादत्राणावर विशिष्ठ समाजाचे नांव छापून त्या समाजाची अवहेलना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार सोलापुरात घडला आहे. याप्रकरणी त्या कंपनी व शोरूमच्या मॅनेजरवर ॲट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी पोलीस आयुक्तांकडे मंगळवारी, एका निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सोलापुरातील व्हीआयपी रस्त्यावर असलेल्या 'मोची' शोरूममधील चप्पलेवर 'मौची' असे नाव प्रिंट करून समस्त मोची समाजाचा अपमान केला आहे. महाराष्ट्रात बहुसंख्येने असणारा मोची समाज अनुसूचित जातीपैकी एक आहे. 
पादत्राणावर मोची समाजाचे नाव छापून मोची समाजाचा अवमान करणाऱ्या शोरूमवर ॲट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होणे अगत्याचे आहे.
 
तरी 'मोची' मेट्रो ब्रँडस चे चेअरमन रफीक मलिक आणि सोलापुरातील शोरूमचे मैनेजर यांच्यावर अनुसूचित जाजी जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केली आहे.
To Top