सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी, ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सर्व नागरिकांनी एकत्रितपणे ०१ तास स्वच्छता अभियानांतर्गत पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर आस्थापना अंतर्गत सर्व पोलीस ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी यांनी आपले कार्यालयात/परिसरात स्थानिक महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका कार्यालयाकडील उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचे समन्वये श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविले.
पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त, (मुख्यालय) अजित बो-हाडे, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) डॉ. दिपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अशोक तोरडमल, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), श्रीमती प्रांजली सोनवणे व इतर पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत पोलीस आयुक्त कार्यालय व परिसरात स्वच्छता अभियान उपक्रम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.
पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर अंतर्गत असलेले पोलीस ठाणे, शाखा, पोलीस मुख्यालयाकडील पोलीस अधिकारी व अंमलदार ज्यांचे त्यांचे कार्यक्षेत्रातील परिसरात दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करुन स्वच्छता अभियान उपक्रम राबवून परिसर स्वच्छ केले.
सदर स्वच्छता अभियान उपक्रम रविवारी, ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वा. पासून ०१ तास श्रमदान करुन स्वच्छता अभियान पूर्ण करण्यात आले.