“दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” अभियानाचे बुधवारी आयोजन ;मोफत बसची सुविधा

shivrajya patra
सोलापूर : 
सोलापूर महानगपालिका, सोलापूर व समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवासाठी “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” हे अभियान होटगी रस्त्यावरील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, परिसरातील कर्मवीर काडादी मंगल कार्यालयात बुधवारी, २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी सोलापूर शहरातील दिव्यांग बांधवांनी शासनाच्या या विविध योजनेचा लाभ घ्यावे. असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे. 

तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांगाना व्यक्तींना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी एस.टी. स्टँड गेटच्या शेजारी, रेल्वे स्टेशन, सात रस्ता, तुळजापूर नाका पूलाखाली तसेच अक्कलकोट नाका पाण्याचे टाकी या ठिकाणाहून कार्यक्रम स्थळी नेण्यासाठी परिवहन विभागाची मोफत बसची व्यवस्था करण्यात आली, असल्याचेही आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सांगितले.
To Top