पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ गणपतीची भक्तीभावात प्राणप्रतिष्ठा

shivrajya patra

सोलापूर : मोठ्या भक्तीभावात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आज मानाचा पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा मध्यवर्ती ट्रस्टी व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.

यावेळी मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टचे पांडुरंग दिद्दी, उत्सव अध्यक्ष संजय साळुंखे, सचिव अक्षय अंजिखाने, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का, कार्याध्यक्ष संदीप महाले, मिरवणूक प्रमुख विश्वनाथ दुर्लेकर, नागेश गंजी,  नागेश बंडी, प्रवीण कांबळे, विजयकुमार गुल्लापल्ली, अविनाश मंगलपल्ली, अंबादास कुडक्याल,बोमेंन काका सर्व विश्वस्त, पदाधिकारी-कार्यकर्ते व गणेशभक्त उपस्थित होते.
To Top