माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांचे मुंबईतील निवासस्थानी गणरायाचं स्वागत

shivrajya patra

मुंबई : गणनायक गणपतीच्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहिली जाते. मंगळवारी सुखकर्त्या, दुखहर्त्या विघ्नविनाशक गणरायाचं सर्वत्र हर्षोल्हासात आगमन होत आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या परिवारानं मुंबईच्या निवासस्थानी गणरायाची प्राण प्रतिष्ठापना केलीय. 'गणराया, सर्वांचे जीवन सुखी कर' असं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गणरायाकडे मागणं मागितले.


पारंपारिक वाद्यांबरोबर आधुनिक वाद्याच्या दणदणाटात मिरवणुका निघाल्या असून सायंकाळपर्यंत गणनायकाची मंडळाच्या मंडपात प्रतिष्ठापना होत आहे.तद्वत घरा-घरात उल्हासी वातावरणात 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत त्याची प्रतिष्ठापना करण्यात आल्या.


विघ्नहर्ता, सुखकर्ता, गणराया सर्वांना सुखाचे आणि समृद्धीचे आयुष्य दे, जे काही विघ्न महाराष्ट्रावर देशावर असतील ते संकट दूर होऊन स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळू दे, महिला शेतकरी, दीन, वंचित सर्वांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होऊ दे, लोकशाही, लोकांचा आवाज आणि संविधान पुन्हा एकदा खंबीर होऊ दे, सर्वांची दुःखे, संकटे दूर व्हावी, हीच प्रार्थना ! या शब्दात यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी गणपती बाप्पास समोर प्रार्थना केली, त्यावेळी त्यांनी 'सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! ' दिल्या.
To Top