सोलापूर/२९ सप्टेंबर : उपविभागीय दंडाधिकारी, माढा विभाग कुर्डूवाडी यांचेकडून १४ सप्टेंबर २०२३ अन्वये पोलीस पाटील पद सरळ सेवा भरती २०२३ चा जाहीरनामा प्रसिध्द करणेत आलेला होता. त्यामध्ये ज्या व्यक्तीस पोलीस पाटील म्हणून काम करणेची इच्छा आहे. त्यांनी आपले अर्ज दिनांक १८ सप्टेंबर २०२३ पासून ०३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ( शासकिय सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० वाजेपर्यंत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय माढा विभाग कुईवाडी येथे समक्ष सादर करणेबाबत कळविणेत आले होते.
तथापि जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडील आदेश २७ सप्टेंबर २०२३ अन्वये अनंत चुतर्दशीची दि. २८ सप्टेंबर
२०२३ रोजीची स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे. तसेच २९ सप्टेंबर २०२३ ते ०२ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सलग शासकीय सुट्टी आल्याने, अर्जदारास पुराव्याची कागदपत्रे विहीत मुदतीत जमा करणेस शक्य होणार नाही, ही बाब निदर्शनास आली आहे.
तरी उमेदवारास अर्ज करणेची मुदत वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे सुधारित जाहिरनामा प्रसिध्द करून, त्याद्वारे माढा उपविभागातील माढा व करमाळा तालुक्यातील पोलीस पाटील भरतीमधील गावातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, त्यांनी आपले अर्ज दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ ऐवजी ०५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत (शासकिय सट्टीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० सायं. ०५.०० वाजेपर्यंत उपविभागीय दंडाधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी यांचे कार्यालयात समक्ष सादर करावेत.
या मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस पाटील निवड समिती २०२३ चे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी माढा प्रियंका आंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकांना वेळ कळविले आहे. तसेच १४ सप्टेंबर २०२३ रोजीच्या जाहिरनाम्यातील इतर कोणताही बदल नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.
0000000