भंडारा :
अहमदनगरमधील सावेडी येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. या बैठकीत पत्रकारांसंबंधी जे वक्तव्य केलं, ते वादग्रस्त ठरलंय. पत्रकारांनी २०२४ पर्यंत भाजपविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचे म्हणजे तुम्हाला समजलेच असेल. पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा', असा अजब सल्ला भाजप पदाधिकाऱ्यांना दिला होता.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बेताल वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यावर त्यांच्या त्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला गेला. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत भंडारा येथील पत्रकारांनी बावनकुळे यांच्यासाठी ढाब्यावर जेवणाचे "आवतण" दिले आहे. आवतण देणारे पत्रच भंडाऱ्यातील पत्रकारांनी बावनकुळेंना लिहिले आहे.
आवतण पत्रातील मजकूर जसा आहे. तसा...
"२०२४ च्या निवडणुकीपर्यंत भाजपविरुद्ध बातम्या प्रकाशित होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आपण 'पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या' असा सल्ला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला. कसेही करा पण पत्रकारांना मॅनेज करा, असा अर्थबोध आपल्या वक्तव्यातून होतो. आपण पत्रकारांची एवढी काळजी घेत असल्यामुळे पत्रकारांनाही आपले ऋण फेडावेसे वाटत असल्यामुळे आम्ही भंडाऱ्यातील पत्रकारांनी आपल्यासाठी चहा आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे.
२०२४ च्या निवडणुकीपर्यंत भाजपविरुद्ध बातम्या प्रकाशित होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आपण 'पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या' असा सल्ला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला. कसेही करा पण पत्रकारांना मॅनेज करा, असा अर्थबोध आपल्या वक्तव्यातून होतो. आपण पत्रकारांची एवढी काळजी घेत असल्यामुळे पत्रकारांनाही आपले ऋण फेडावेसे वाटत असल्यामुळे आम्ही भंडाऱ्यातील पत्रकारांनी आपल्यासाठी चहा आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे.
जेवणात आपल्या आवडीनुसार मेन्यू बोलावता येईल. आपल्याला अपेक्षित पाण्याचीही व्यवस्था केली असून त्याचे संपूर्ण बिल देण्यासाठी आम्ही पत्रकार सक्षम आहोत, त्यामुळे त्याची काळजी करण्याचे कारण नाही. भोजनाच्या या कार्यक्रमाला आपण स्वतः उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे, ही विनंती”
बावनकुळेंची बेताल बडबड
२०२४ पर्यंत भाजपविरोधात एकही बातमी येणार नाही, याची काळजी घ्या. भाजपसंदर्भात सगळ्या सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत. तुम्ही ज्या बुथवर काम करताय तेथे पत्रकार कोण आहेत याची माहिती घ्या. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियावाले, पोर्टलवाले यांना चहाला न्या. चहा प्यायला बोलवायचे म्हणजे तुम्हाला समजलेच असेल. पत्रकारांना ढाब्यावर जेवायलाही घेऊन जा, असंच ते बरळले होते. ते ऋण फेडण्यासाठी पत्रकारांनी बावनकुळे यांना आवतण पत्रात म्हटले आहे.