कासेगांव/संजय पवार
विघ्न विनाशक, गणनायक गणेशाच्या आगमनाची चाहूल लागताच, गणेशभक्त गणरायाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करीत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव संभाजी, नगर, बिरोबा वस्तीमधील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, शुक्रवारी सायंकाळी पार पडली. या बैठकीत यंदाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी गणेश आवताडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यंदाच्या उत्सव समितीत उपाध्यक्ष ओंकार चौगुले, खजिनदार प्रशांत चौगुले, सहखजिनदार प्रमोद वाडकर, मिरवणूक प्रमुख अप्पा पोपळकर, पपू कोले, विनोद वाडकर, शिवपाल रेड्डी, केशव चौगुले, बालाजी हब्बू, सुनील आवताडे, प्रभाकर रेड्डी, गणेश जाधव, नवनाथ क्षिरसागर, अनिकेत यादव, संदिप पवार, तानाजी मिटकरी, शंकर हब्बू, ज्ञानेश्वर रेड्डी, लक्ष्मण रेड्डी यांची वर्णी लागली आहे.
गणेशोत्सव मंडळाचे सल्लागार राम अप्पा चौगुले, संजय पवार, संजय चौगुले, मोहन रेड्डी, तानाजी हब्बू, सुरेश आवताडे, नागनाथ शिंदे, यांच्यासह मंडळाचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन केशवराव चौगुले यांनी केले तर संजय पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
यंदाच्या गणेश उत्सवात शंकर हब्बू यांनी गणेश मूर्ती देण्याचा संकल्प केला आहे. नवनाथ क्षिरसागर, ज्ञानेश्वर रेड्डी, सूरज अत्तार महाप्रसादाची व्यवस्था करीत आहेत. याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करण्यात आले.