ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी योग प्रशिक्षणाचे आयोजन : अनुराधा खारे

shivrajya patra

सोलापूर/कय्युम जमादार
ग्रामीण भागात योगसंदर्भात माहिती देऊन जनजागृती करून लोकांना योग करण्यासाठी प्रवृत्त करण्याकरिता या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याचे योग प्रशिक्षक अनुराधा खारे यांनी सांगितले. 

उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळवंची येथे विद्यार्थी व शिक्षकांसाठी एकदिवसीय योग प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या योग प्रशिक्षक अनुराधा सोपान खारे यांनी विद्यार्थ्यांना योग, व्यायाम आणि समतोल आहार याबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून करण्यात आला. या शिबीरात विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कारासह योगासनांच्या अन्य आसनांची प्रात्याक्षिके करून घेतली. यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीचे सर्व विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापक व सहशिक्षकांनी सहभाग घेतला होता.

यावेळी शाळा परिसरातील हिरवाई, परस बाग, विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून योगा प्रशिक्षक अनुराधा खारे यांनी, शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेकडून योग प्रशिक्षक अनुराधा खारे यांचा सरपंच तृप्ती पौळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी सरपंच तृप्ती पौळ, संजय पौळ, मुख्याध्यापक सोनवणे, पोलीस पाटील तानाजी यादव, सहशिक्षक श्रीमती आगाजे, श्रीमती पौळ, श्रीमती सालसकर, श्रीमती माने, श्रीमती शिंदे, श्रीमती सुतार, सुरवसे, लोंढे, माने यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top