कासेगाव/संजय पवार :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महार रेजिमेंटचा ०१ ऑक्टोबर हा स्थापना दिवस समता सैनिक दल, शाक्य संघ आणि सिदनाक ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती निवृत्त पोलीस अधीक्षक अशोककुमार भालेराव, अण्णासाहेब भालशंकर आणि जयानंद कांबळे यांनी दिली.
फुले- शाहू आंबेडकर चळवळ आणि बौद्ध धम्म विषयक येणारे सर्व धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम या तीन संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आणि समनवयाने घेण्याचा निर्णय शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे या तीन संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या रोजी महार रेजिमेंटमधून निवृत्त झालेल्या सैनिक बांधवांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीचे प्रास्ताविक आणि आभार केरु जाधव यांनी केले.
याप्रसंगी समता सैनिक दलाचे जी ओ सी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरु जाधव, ज्युनिअर जी ओ सी प्राचार्य वसिष्ठ सोनकांबळे, विकी जाधव, शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके, निवृत्त पोलीस अधीक्षक अशोककुमार भालेराव, निवृत्त पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब सरवदे, निवृत्त पोलीस निरीक्षक गौतम चंदनशिवे, धर्मराज कांबळे, गोपीनाथ कांबळे, अंबादास बनसोडे, चंद्रकांत कांबळे, शेखर वाघमारे, आण्णाराव गायकवाड, सूर्यकांत गजघाटे, सिदनाक ब्रिगेडचे प्रमुख जयानंद कांबळे, प्रमोद जाधव, इत्यादी उपस्थित होते.