कासेगांव/प्रतिनिधी : श्री शिक्षण प्रसारक मंडळी, संचलित सोलापूर या संस्थेचे उपाध्यक्ष तसेच हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगे तळे शालेय समितीचे चेअरमन, तथा सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विद्याधर जगताप यांचे अल्पशः आजाराने सोमवारी, २५ सप्टेंबर रोजी निधन झाले, ते मृत्यूसमयी ६८ वर्षांचे होते.
त्यांच्या निधनाबध्दल संस्थेतील सर्व पदाधिकारी, सदस्य, हर्षवर्धन हायस्कूलमधील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी दुःख व्यक्त केले. त्यांच्या पार्थिवावर सोलापूर येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.