जात पडताळणी अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून व्हावी कायदेशीर कारवाई : राजाभाऊ सोनकांबळे

shivrajya patra

सोलापूर : जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनुसूचित जाती/अनु.जमातीच्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करून मिळण्यासाठी आलेल्या प्रस्तावासोबत जोडलेल्या मुळ कागदपत्रांची तसेच शासकीय दस्तावेजांची खातरजमा किंवा कुठलीही अधिकृपणे समिती समोर सखोल चौकशी न करता हिंदू " यलमर " या खुल्या प्रवर्गांमध्ये येणाऱ्या आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सूचिच्या यादीमध्ये नांव नमुद नसलेल्या जातीच्या कर्मचाऱ्यांना अनुसूचित जातीमध्ये येणाऱ्या हिंदु " यल्लमलवार " या जातीचे जात वैधता प्रमाणपत्र दिलेले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरकारभाराची खातेनिहाय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन आरक्षण हक्क कृती समितीच्या सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक राजाभाऊ सोनकांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे ( बार्टी ) चे महासंचालक सुनील वारे यांच्या मुख्य दालनामध्ये समक्ष भेटून दिले. 

याबाबत सोलापुरातील वृत्त पत्रामध्ये तक्रारी रूपाने अनेकवेळा बातम्या आलेल्या आहेत. सोलापूर जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या  कार्यालयामध्ये सादर केलेल्या मूळ प्रस्तावासोबत जोडलेल्या जिल्हा परिषद शाळेचे दाखले तसेच व महसुली कागदपत्रामध्ये कर्मचाऱ्याची हिंदु " यलमर " या जातीची नोंद असल्याने जिल्हा परिषद शाळेमधील मुळ जातीची नोंद असलेल्या आडनावात तसेच कागदपत्रामध्ये आणि  दस्तावेजामधील नोंदी असलेल्या आडनावामध्ये खाडाखोड करून हिंदु " यलमर " अशी जातीची नोंद असलेल्यामध्ये हिंदु " यल्लमलवार " या अनुसूचित जातीचे दाखले मिळवून घेतलेले आहेत. हे बोगस जातीचे दाखले मिळविणाऱ्यांनी शिक्षणासह नौकरीविषयक आणि त्यांच्या मुलांच्याही उच्च शिक्षणासाठी उपयोग करून घेतेलेली आहेत.

त्यांच्याबरोबर त्यांची मुलंही शिक्षणाबरोबर मागासवर्गीयासाठी राखीव असलेल्या जागेवर नेमणूका करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे मूळ मागासवर्गीय असलेल्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. याला केवळ जात पडताळणी समितीचे सर्व वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. अशा जबाबदार अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी, अन्यथा आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने उग्र स्वरूपात आंदोलन करावे लागेल, असा इशारा आरक्षण हक्क कृती समितीच्या सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक राजाभाऊ सोनकांबळे यांनी दिला.
To Top