गणेशोत्सव विसर्जन बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस बलाच्या एका कंपनीशिवाय दोन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा

shivrajya patra
सोलापूर : शहर आणि जिल्ह्यात गुरूवारी, २८ सप्टेंबर रोजी येत असलेल्या अनंतचतुर्दशी दिवशी सार्वजनिक गणेशोत्सवाचे विसर्जन होत आहे. त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. या उत्सवाची सांगता शांततामय वातावरणात व्हावी, म्हणून सोलापूर पोलिस आयुक्तालयाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यासाठी ०३ पोलीस उप आयुक्त, ०६ सहाय्यक पोलीस आयुक्त, २७ पोलीस निरीक्षक, ९७ सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, १४३० पोलीस कर्मचारी, ५०० गृहरक्षक दलाचे जवान आणि राज्य राखीव पोलीस बलाची एक कंपनी तैनात करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्तालय माहिती कक्षाने एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.

 सोलापूर शहरात १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. सोलापूर शहरात ११७७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन झालेली आहेत. त्याचबरोबर जवळपास ९७,००,०० घरगुती गणपती स्थापन झालेले आहेत. गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशी दिवशी सार्वजनिक गणेशोत्सवाचे विसर्जन होत आहे.
                                      (प्रतिकात्मक छायाचित्र)

त्यानिमित्ताने सोलापूर शहरात वेगवेगळ्या अशा एकूण दहा ठिकाणाहून विसर्जन मिरवणूका निघतात. गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी शहरात १४ ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेतर्फे सोय करण्यात आलेली आहे. तसेच ८३ ठिकाणी गणेश मुर्ती संकलन करण्याची सोय करण्यात आलेली आहे, असेही त्या पत्रकात नमूद केले आहे.

सोलापूर शहराचा गणेशोत्सव काळातील बंदोबस्ताचा इतिहास लक्षात घेता, शहरातील एकूण ६६ संवेदनशिल ठिकाणी दिवस-रात्र सत्रांमध्ये फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत. फिक्सपॉईन्ट करीता ०८ पोलीस अधिकारी, १४० पोलीस अंमलदार व १२० होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मध्यवर्तीच्या माध्यमातून निघणाऱ्या मिरवणूकांसाठी ०३ पोलीस उप आयुक्त दर्जाचे अधिकारी, ०६ सहा. पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी, २१ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी, ४७ सहा. पोलीस निरीक्षक/पोलीस उप निरीक्षक, ५५० पोलीस अंमलदार, १५० होमगार्ड, व एक एसआरपीएफ कंपनी असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

शहरात १४ ठिकाणी गणेश विसर्जनाचे ठिकाणी ०१ पोलीस निरीक्षक, १० सहा. पोलीस निरीक्षक/पोलीस उप निरीक्षक, ८० पोलीस अंमलदार व ६० होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मुर्ती संकलनाचे ८३ ठिकाणे असून सदर ठिकाणी ८३ पोलीस अंमलदार व ८३ होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. याशिवाय स्वतंत्र निघणाऱ्या मिरवणूकांसाठी ०७ पोलीस अधिकारी, ६० पोलीस अंमलदार व ६० होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

तसेच बीट मार्शल, पिसीआर मोबाईल पेट्रोलिंग, वज्र वाहन, वरुण वाहन, आरसीपी, क्युआरटी व स्ट्रायकिंग फोर्स असे सुमारे २५० पोलीस अंमलदार कर्तव्य बजाविणार आहेत. शहरातील वाहतूक नियमन व गणेश विसर्जन बंदोबस्ताकरीता शहर वाहतूक शाखेचे ०२ पोलीस निरीक्षक, ०८ सहा. पो. निरीक्षक/पोलीस उप निरीक्षक, १५० पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त आहे.

हा उत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी बंदोबस्तासाठी १५० पोलीस कर्मचारी, ५०० होमगार्ड बाहेरून मागविण्यात आले आहेत. या बंदोबस्त राज्य राखीव पोलीस बलाची १ कंपनीही तैनात असल्याचेही सांगण्यात आले.
To Top