मंगळवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

shivrajya patra
सोलापूर/२७ सप्टेंबर : 
जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी ऐकण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे मंगळवारी, ०३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

सोमवार, ०२ ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने माहे ऑक्टोबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवार दिनांक ०३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या लोकशाही दिनात मागील महिन्यातील प्रलंबित निवेदन व अर्ज, माहिती अधिकार अधि.-२००५ अंतर्गत प्राप्त अर्ज, आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीवर केलेली कार्यवाही याबाबत निपटारा करण्यात येणार आहे. तरी सर्व विभाग प्रमुखांनी लोकशाही दिनात उपस्थित रहावे, असे आवाहन  निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.
To Top