रविवारी राज्यस्तरीय 'प्रबुध्द पुरस्कार' वितरण समारंभ

shivrajya patra

भीमशाहीर जानराव, डॉ. रामटेके, डॉ. कांबळे, डॉ. मस्के, डॉ. सरवदे यांची निवड 

सोलापूर/प्रतिनिधी : भारतीय प्रबुद्ध रंगभूमी, दिनानिमित्त अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेच्या विद्यमाने प्रबुद्ध रंगभूमी सोलापूर, आयोजित राज्यस्तरीय 'प्रबुद्ध पुरस्कार' वितरण सोहळ्याचे उद्घाटन भारतीय प्रबुध्द सांस्कृतिक चळवळीचे प्रवर्तक भीमपुत्र टेक्सास गायकवाड हे करणार असून त्यांच्याच हस्ते राज्यातील प्रबुध्द पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय प्रबुध्द नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. किर्तीपाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रबुध्द साहित्य परिषदेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक यु.एफ.जानराव यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेला पुरस्कार वितरण सोहळा, रविवारी, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ०५ वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे होत असल्याचे प्रबुध्द नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. किर्तीपाल गायकवाड यांनी प्रारंभी सांगितले.

समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अशोक गायकवाड, प्रदेशाध्यक्ष भारतीय रक्षक आघाडी (सातारा), अंबादास शिंदे, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र दलित पँथर, संजय सायरे, अध्यक्ष प्रबुद्ध नाट्य परिषद (नागपूर), हरिश्चंद्र डहाट, राष्ट्रीय सचिव, द पिपल्स ऑफ जम्बूदीप (बीड), डॉ. शंकरलाल गिहारा, नॅशनल मास्टर जीत कुने दो, नवी दिल्ली, डॉ. कुमार लोई, राष्ट्रीय अध्यक्ष, मानवाधिकारी संघटना, नवी दिल्ली, अ. मिलिदकांबळे गुरूजी (कर्नाटक), बाळासाहेब सरवदे (माजी डी.वाय.एस.पी.) आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या समारंभात भीमशाहीर रामचंद्र जानराव यांना ('युगकवी वामन कर्डक गीतकार गायक पुरस्कार) डॉ. सुनिल रामटेके ( अश्वघोष प्रबुध्द नाटककार पुरस्कार), डॉ. उत्तम कांबळे, (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधक पुरस्कार), डॉ. सुहास सरवदे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबुध्द चित्रकार पुरस्कार), डॉ. औदुंबर मस्के (क्रांतिबा जोतिबा फुले प्रबुध्द अभिनेते पुरस्कार), शंकरराव तायडे (क्रांतिबा जोतिबा फुले प्रबुध्द क्रांतीनायक पुरस्कार), श्रीकांत कसबे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबुध्द पत्रकार पुरस्कार) आदि विजेत्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबुध्द्ध कवी कल्याण श्रावस्ती हे करणार असून या समारंभास कलावंत कार्यकर्ते व बहुजन जनतेनी उपस्थित राहावे, असे आवाहन समारंभाचे कार्याध्यक्ष अक्षय बबलाद, स्वागताध्यक्ष फारूख शेख, निमंत्रक रामजी गायकवाड, प्रबुध्द गायकवाड व प्रा. प्रियांका सितासावद यांनी केले आहे.
To Top