सेंद्रिय हुरडा उत्पादक शेतकरी मेळावा व ३५० शेतकऱ्यांना हुरडा बियाणे वाटप कार्यक्रम

shivrajya patra
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० वर्षपूर्ती निमित्त बसवसंगम शेतकरी गट, चाणक्य गुरुकुल व ड्रीम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तर्फे शुक्रवारी, ०६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. सात रस्ता, येथील ड्रीम फौंडेशन सभागृहात ३५० शेतकऱ्यांना हुरडा ज्वारी बियाणे (सुरती, गूळभेंडी, फुले मधुर) वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक काशिनाथ भतगुणकी यांनी दिली.

सोलापूरला ज्वारीचे कोठार म्हटले जाते, पण हुरडा ज्वारी उत्पादनमध्ये आपले शेतकरी पुढाकार घेत नाहीत, ज्वारीला ३५ ते ५० रुपये किलोला भाव मिळतो, पण हुरडा ज्वारीला २०० ते ४०० रुपये भाव सिझन मध्ये मिळतो, दरवर्षी लाखो लोक सोलापूरमध्ये हुरडा पार्टीसाठी येतात पण दुर्दैवाने हुरडा उत्पादनमध्ये अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर येथे जास्त होते ,आपण येथून हुरडा आणून पार्टी करतो.

मित्रांनो २ रुपये किलो ने ऊस विकणारा शेतकरी, शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून निराश होतो पण बाजारात ज्याला मागणी आहे ते उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि मार्केटिंग जबाबदारी बसव संगम शेतकरी गट व ड्रीम फौंडेशन घेणार आहे असे भतगुणकी यांनी कळविले आहे,यांना १०० टन पेक्षा जास्त हुरडा राज्यभर मागणी असणार असून प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती आहे छोटे प्रमाणात का होईना हुरडा ज्वारी उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घ्यावेत.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यंदा सोलापूरमध्ये हुरडा महोत्सव घेण्याचे आवाहन ड्रीम फौंडेशनतर्फे आयोजित कृषी पर्यटन संचालक मेळाव्यात केले आहे. त्यास सकारात्मक प्रतिसाद म्हणून हुरडा उत्पादक शेतकरी मेळावा घेऊन बियाणे वाटप कार्यक्रम आणि हुरडा उत्पादन मार्गदर्शन मान्यवरांच्या अभ्यासपूर्ण आधुनिक पद्धतीने व सेंद्रिय हुरडा उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळणार आहे. कोणते हुरडा बी लागवड करावेत, देखभाल व काढणी तंत्रज्ञान, हुरडा विक्री कौशल्य आणि शेतात हुरडा पार्टी कसे करावेत, यावर मार्गदर्शन मिळेल.

या कार्यक्रमात विविध ऍग्री प्रोड्युसर कंपनी, हुरडा पार्टी आयोजित करणारे संस्था व कृषी पर्यटन केंद्र संचालक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

हा कार्यक्रम सर्वांकरिता उपयुक्त असून नावनोंदणीसाठी संपर्क सतीश पाटील, भ्रमणध्वनी : 7219099955
स्थळ : ड्रीम फौंडेशन सभागृह, हुमा मेडिकल रोड, 
सात रस्ता, सोलापूर.भ्रमणध्वनी : 8275728388
बसवसंगम शेतकरी गट : भ्रमणध्वनी : 9890948388
To Top