सोलापूर : गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मोटार सायकल व मोबाईल विक्रीसाठी शिंदे चौकात आलेल्या एका संशयितास सपोनि धायगुडे व त्याच्या पथकातील अंमलदारांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देणारा संशय पोपटाप्रमाणे बोलला. ओमप्रकाश रामनिवास कमेडीया (वय-३३ वर्ष) असे त्याचे नाव असून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी आठ दुचाकी व मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून ०३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे फौजदार चावडी पोलिसांनी सांगितले.
अलीकडच्या काळात, घडलेले वाहन चोरीचे गुन्हे, चोरीची पद्धत या घटनांचा सखोल अभ्यास करून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनानुसार तपास करीत असताना सफोनी धायगुडे व त्यांच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार ओम प्रकाश कमेडिया (रा. मु.पो. डांगाबास, कमेडीया का बांस, जिल्हा-नागौर, राज्य- राज्यस्थान) यात ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडील नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीसंबंधी कसून चौकशी करता, त्याने सोलापूर शहर, पुणे व उस्मानाबाद जिल्ह्यात मोटार सायकली चोरल्याची कबुली दिली.
त्याच्याजवळील दुचाकी शिवाजी महाराज चौकातून व खिशातील मोबाईल नव्या पेठेत हातगाडीवर कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या इसमाच्या पॅन्टच्या खिशातून चोरल्याची कबुली दिली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि एस.एस.धायगुडे व त्यांचे तपास पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून ओमप्रकाश च्या ताब्यातून सात मोटरसायकली व एक मोबाईल हस्तगत करण्यात आला त्याची किंमत ०३ लाख ३५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
उघडकीस आलेल्या सात गुन्ह्यांमध्ये फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील -४, इंदापुर पोलीस ठाणे, पुणे- १ व नळदुर्ग पोलीस ठाणे, उस्मानाबाद-१, कुर्डुवाडी पोलीस ठणेकडील-१ असे एकुण ७ गुन्ह्यांचा समावेश असल्याचे फौजदार चावडी पोलिसांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-१) संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद, पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, प्रविण चुंगे, रविंद्र परबत, अजय पाडवी, अमृतराव कदम, विनोद व्हटकर, कृष्णाय बहुरे, नितीन मोरे, सविनकुमार लवटे, अजय चव्हाण, विनोद पुजारी, पंकज घाडगे, सुधाकर माने, तौसिफ शेख, अमोल खरटमल, शशिकांत दराडे, नागनाथ गुळवे यांनी केली.