सेडाच्या अध्यक्षपदी आनंद येमूल तर सचिवपदी भुषण भुतडा

shivrajya patra


सोलापूर : साेलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन (सेडा) या इलेक्ट्राॅनिक्स्, हाेम अप्लायन्सेस, काॅम्प्युटर्स व टेली कम्युनिकेशन्स् डिलर्स संस्थेच्या २०२३-२५ कालावधीसाठी अध्यक्षपदी आनंद येमूल तर सचिवपदी भुषण भुतडा यांची निवड करण्यात आली. हॉटेल मयूरवन येथे झालेल्या संस्थेच्या पंचविसावी वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्य निवडणूक अधिकारी तथा माजी अध्यक्ष जितेंद्र राठी यांनी संस्थेची निवडणूक अविरोध झाल्याची घोषणा करीत ही निवड जाहीर केली.

निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष डॉ. सुरजरतन धूत, सहसचिव हिरानंद(हरीश) कुकरेजा, खजिनदार सुयाेग कालाणी, सहखजिनदार गिरीष मुंदडा, संचालक मंडळात यल्लप्पा भोसले, चंद्रकांत शहापूरे , संदेश कोठारी, राजेश जाजू व बसवराज नवले यांचा समावेश आहे.  माजी अध्यक्ष दीपक मुनोत व शिवप्रकाश चव्हाण यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.  

आपले मनाेगत व्यक्त करताना नुतन अध्यक्ष आनंद येमूल म्हणाले कि, सर्व सभासदांना साेबत घेऊन सर्वांच्या उत्कर्षासाठी अनेकविध उपक्रम आगामी वर्षात 'सेडा' तर्फे राबविले जातील. सभासदांच्या स्टाफसाठी वैद्यकिय व शैक्षणिक मदत याेजनांना बळकटी देणे, यावर कटाक्ष असेल. सेडाचा महत्वाचा उपक्रम म्हणजे प्रतिवर्षी हाेणारे इलेक्ट्राे हे प्रदर्शन.ते प्रदर्शन निटनेटके, स्वच्छ, सुंदर व सभासदांच्या सहविचाराने भरविले जाईल. सेडाचे पूर्व पदाधिकारी व नवीन सभासद यांची सांगड घालून संस्थेस एका वेगळ्या उंचीवर पाेहचविण्याचा त्यांचा मानस आहे. सभासदांनी व्यक्त केलेल्या विश्वासास पात्र ठरु अशीही ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

मावळते अध्यक्ष ईश्वर मालू यांनी आपल्या कारकिर्दीचा आढावा घेत सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. सचिव भुषण भुतडा यांनी पुढील इलेक्ट्राे प्रदर्शनासाठी सभेची परवानगी घेतली तर खजिनदार सुयोग कालाणी यांनी आभार प्रदर्शन केले.

या सभेस माजी अध्यक्ष सतीश मालू,  जितेंद्र राठी, दीपक मुनोत, शिवप्रकाश चव्हाण, विपीन कुलकर्णी, कौशिक शाह, दिलीप राऊत यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
To Top