Type Here to Get Search Results !

बलभिम भाऊ शिंदे यांना मातृशोक


अक्कलकोट : तालुक्यातील दहिटणे  गावचे सुपुत्र तथा सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष बलभिम भाऊ शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती अंजनाबाई दत्तात्रय शिंदे यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले, मृत्यूसमयी त्यांनी आहे शंभरी पूर्ण केली होती.

त्यांच्या पश्चात तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्या अक्कलकोट मार्केट कमिटीचे माजी सभापती गोकुळ शिंदे यांच्या मातोश्री तर गोकुळ  शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांच्या आज्जी होत.


त्यांची अंत्ययात्रा शनिवारी, ०२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. दहिटणे येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे. अंत्यसंस्कार दहिटणे येथील शेतात होणार असल्याचे सांगण्यात आले.