Type Here to Get Search Results !

मराठी सिनेरसिकांनी आवर्जून पहावा असा 'बापल्योक'


शुक्रवारी, ०१ सप्टेंबर रोजी सोलापुरातील उमा मंदिरात एक अप्रतिम मराठी चित्रपट बाप ल्योक हा पाहण्याचा योग आला. एक अतिशय सुंदर गावरान कथानक... ज्यामध्ये बाप लेकाचे नाते दाखवले आहे.कठोर दिसणारा बाप किती हळवा असतो, हे अतिशय हळूवारपणे या चित्रपटात दाखवलं आहे.
मुलाच्या लग्नासाठी पत्रिका वाटायला जाणे ही अतिशय साधी गोष्ट.परंतु या चित्रपटातील बाप-लेक ज्या वेळेला लग्नाची पत्रिका वाटायला जातात, त्यावेळेला घडणाऱ्या घटनांचा हा विषय. अतिशय सुंदर मांडणी या मांडणीतून वेगवेगळ्या नात्यांची मैत्रीची कशी गुंफण करावी, हे दाखवणारा हा चित्रपट.

सोलापूर, तुळजापूर अशा अन्य भागात चित्रीकरण झालेला हा चित्रपट एकदा तरी अवश्य पहावा, या चित्रपटांमध्ये सोलापूरचे ही अनेक कलावंत आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतील. आपल्या सोलापुरातही उत्तम उत्तम कलाकार आहेत, हे हा चित्रपट पाहिल्यावर आपणास समजेल.

अतिशय सुंदर चित्रीकरण, अतिशय सुंदर दिग्दर्शन,कथा, पटकथा,अतिशय अप्रतिम. यामध्ये काम करणारे कलावंत प्रत्येक भूमिका अविस्मरणीय करून सोडतात. शशांक शेंडे या कलावंताने तर अतिशय अप्रतिम दर्जाचा अभिनय केला आहे. त्यांच्या मुलाची भूमिका करणारा कलावंत, जो स्वतः या चित्रपटाचा लेखकही आहे ! तो विठ्ठल काळे हा ही आपल्या सोलापूर जिल्ह्यातलाच...

तिरक्या रेघेवरच असतं बापल्योकाचं नातं. ताणलं तर आयुष्यभराचं ताणतं, अन् घावलं तर ?...तेच हुडकण्यासाठी आमी समदी एकत्र आलोय’, असं मकरंद माने सांगतात.
‘बापल्योक’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे.

छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन आशय गाताडे यांचे आहे. ध्वनी आरेखन पियुष शहा यांचे आहे. वेशभूषा अनुत्तमा नायकवडी तर कलादिग्दर्शन महेश कोरे यांचे आहे. मुख्य सहाय्यक दिग्दर्शक अमोल घरत आहेत. रंगभूषा संतोष डोंगरे, कास्टिंग योगेश निकम यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते शंतनू गंगणे आहेत. लाईन प्रोडक्शनची जबाबदारी बहुरूपी प्रोडक्शन्सने सांभाळली आहे.

या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते शंतनू गंगणे हे मूळचे तुळजापूरचे. ते अनेक चित्रपट मालिकांमधून त्यांना असंख्य पडद्यावर पाहिले ही आहे.परंतु या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट असावा. त्यामुळे ह्यामधील सर्व हे आपलेच असल्यामुळे 'बापल्याेक' हा चित्रपट आपण सर्वांनी आवर्जून पहावा, असेच वाटते.