Type Here to Get Search Results !

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम महाडीबीटी पोर्टलवर करावेत अर्ज


                                      (प्रतिकात्मक छायाचित्र)
सोलापूर : एकात्मिक फलोत्पादन विकाय कार्यक्रम या योजनेसाठी काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत जिल्ह्यास शितगृह कोल्ड स्टोरेज या घटकास रक्कम १ कोटी २० लाख इतका कार्यक्रम राबविण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. या घटकांतर्गत खर्चाच्या ३५ टक्के अनुदान अदा करण्यात येते. शितगृहाचे ३ प्रकार असुन ते खालील प्रमाणे आहेत. 

१ घटक:- नवीन शीतगृह युनिट प्रकार-१( एक सारख्या तापमानात राहणाऱ्या उत्पादनासाठी) प्रति चेंबर २५० टन पेक्षा जास्त. मापदंड आठ हजार रुपये प्रति मेट्रिक टन, कमाल मर्यादा ५००० मेट्रिक टन प्रति लाभार्थी, अनुदान खर्चाच्या ३५ टक्के जास्तीत जास्त ५० लाख रुपये.

२ घटक:-शितगृह युनिट प्रकार-२ (एकापेक्षा अधिक उत्पादने व तापमानासाठी ) (प्रति चेंबर २५० टन पेक्षा जास्त) कमीत कमी ६ चेंबर्स पेक्षा जास्त (प्रति चेंबर २५० टन पेक्षा कमी). मापदंड दहा हजार रुपये प्रति मेट्रिक टन. कमाल मर्यादा ५००० मेट्रिक टन प्रति लाभार्थी, अनुदान खर्चाच्या ३५ टक्के जास्तीत जास्त ५० लाख रुपये.

३ घटक:-शितगृह युनिट प्रकार-३(नियंत्रित वातारवणासाठी नविन तंत्रज्ञान राबविणे), मापदंड दहा हजार रुपये प्रति मेट्रिक टन. कमाल मर्यादा ५००० मेट्रिक टन प्रति लाभार्थी, अनुदान खर्चाच्या ३५ टक्के जास्तीत जास्त ५० लाख रुपये.

      तरी जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती व इतर सर्व प्रवर्गातील शेतक-यांना आवाहन करण्यात येते की, वरील प्रमाणे घटकासाठी अधिकाधिक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबधीत नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. एस. गावसाने यांनी केले आहे.