Type Here to Get Search Results !

अनिल गंभीरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार


कासेगाव/प्रतिनिधी : तळे हिप्परगे येथील हर्षवर्धन हायस्कूल येथे गेले २७ वर्ष कार्यरत असणारे ज्येष्ठ अनुभवी मराठी विषयाचे अभ्यासक, उत्तम अक्षरलेखन व वक्तृत्व यामध्ये पारंगत असणारे तसेच प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक अनिल अनंतराव गंभीरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेचे उपाध्यक्ष विद्याधर जगताप, संस्थेचे सचिव विठ्ठलराव गरड, संस्था सदस्य ढवळे व विपुल गंभीरे, मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या अध्ययनातील केलेल्या कार्याचे आपल्या मनोगतातून कौतुक केले व त्यांच्या अध्यापनातील विविध आठवणी याप्रसंगी सांगितल्या तसेच प्रशालेतील शिक्षकांनी त्यांनी केलेल्या कार्याची तसेच त्यांच्या दिलदार स्वभावाची माहिती यावेळी सांगितली.

 त्याचप्रमाणे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत, संस्थेचे उपाध्यक्ष विद्याधर जगताप, सचिव विठ्ठलराव गरड, संस्था सदस्य विपुलराव गंभीरे यांनी आपल्या मनोगतातून  त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी अनिल गंभीरे यांचे नातेवाईक व प्रशालेतील सर्व शिक्षक विद्यार्थी इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता प्रशालेच्या आवारात वृक्षारोपणाने करण्यात आली. अनिल गंभीरे यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.