सोलापूर :
शिवसेना शहरप्रमुख तथा सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज शेजवाल् यांचे बंधू श्रीकांत भास्कराव शेजवाल यांचे पुणे येथील राहत्या घरी गुरुवारी, १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वा. च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांनी महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या पुणे, सोलापूर, नाशिक या कार्यक्षेत्रात कर्तव्यदक्ष वन अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले होते. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या ६४/२, जुने संतोष नगर, देविका गॅस एजन्सीसमोर, सोलापूर येथील राहत्या घरापासून सायंकाळी, ४ वा. निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनावर अनेक शिवसैनिकांनी हृदयस्पर्शी शब्दात श्रद्धांजली अर्पित केली आहे.