उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावच्या उपसरपंचपदी दिलीपराव माने गटाच्या सुनंदा शिवाजी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.
उपसरपंच सागर राठोड यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी ग्रामसेविका मनिषा शिंदे यांनी काम पाहिले. उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी यांनी सुनंदा शिंदे यांची उपसरपंचपदी निवड बिनविरोध जाहीर केली. उपसरपंच निवड होताच नवनिर्वाचित उपसरपंच शिंदे यांचा सत्कार ग्रामपंचायतकडून करण्यात आला.
यावेळी सरपंच तृप्ती पौळ, माजी सरपंच दिनेश जगताप, माजी सरपंच विष्णू भोसले, आरती इंगळे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल जाधव, शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ, तानाजी भोसले, महावीर भोसले, अनंत कोरके, शिवाजी शिंदे, चंद्रहास पवार, तानाजी शिंदे, दिनेश शिंदे, लक्ष्मण पवार, गणेश शिंदे, दत्तात्रय भोसले, सतिश जगताप, संजय आदाटे उपस्थित होते.
..... चौकट ....
गुळवंची ग्रामपंचायतीत महिलाराज
नऊ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत पाच महिला सदस्य आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत ऑपरेटर आणि ग्रामसेविका या सर्व महत्वाच्या पदांवर महिला आहेत. महिलांच्या हातात गावकी आल्याने ग्रामपंचायत मध्ये महिलाराज आले आहे.