सोलापूर : आमदार भास्कर जाधव यांच्या निषेध करत, या पुढील काळात शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य केल्यास भाजप कार्यकर्ता उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्याला भाजप कार्यकर्ता रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी बोलताना दिला.
शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर वर्णभेदावरून केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी, सोलापुरातील कन्ना चौक येथे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत निषेध नोंदविला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अमित पाटील, भाजप माजी उपाध्यक्ष राजू माने, भाजयुमोचे सागर अतनुरे, यतीराज होनमाने, विशाल बनसोडे, डोंगरेश चाबुकस्वार, नागेश पासकंटी, प्रभाकर गणपा, भीमाशंकर जमादार, संदीप काशीद, विजय कोळी, नरेश ताटी, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.