बेरोजगार महिला उमेदवारांसाठी मंगळवारी रोजगार मेळावा ; ११०० पदांची मागणी

shivrajya patra


सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर आणि ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार महिला उमेदवारांसाठी मंगळवारी, २६ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक महिला उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी, आय. टी. आय डिप्लोमा, ग्रॅज्युएट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशीयन, नर्सिंग, बी.कॉम, अशा प्रकारची एकूण ११०० पेक्षा जास्त रिक्तपदे सोलापूर आणि पुणे येथिल उद्योजकांनी अधिसुचीत केलेली आहेत.

नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी आपल्या कागदपत्रासह मंगळवारी, २६ सप्टेंबर रोजी ठीक १० वा. “ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, रविवार पेठ, राजेंद्र चौक, सोलापूर" येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

To Top