सोलापूर : पूर्व विभाग वाचनालयात श्री गणेशोत्सव विविध कार्यक्रम व मान्यवरांच्या हस्ते महाआरती करुन महापुजा केली जाते. गुरुवारी, २१ सप्टेंबर रोजी पूर्व वाचनालयाचे खजिनदार विष्णू कारमपुरी यांच्या हस्ते महापूजा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर वाचनालयात आलेल्या सर्व विद्यार्थी व वाचकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ग्रंथपालक रमा ईप्पलपल्ली, ग्रंथसेवक वनिता कायत, काशिनाथ कोळी, कल्पना सल्ला, शिवसेना युवती सेनेचे शहर प्रमुख रेखा आडकी, कामगार सेनेचे कार्यालय प्रमुख विठ्ठल कुराडकर, साक्षी आळगी यांच्यासह ग्रंथालयातील वाचक विद्यार्थी व बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी
पूर्वविभाग वाचनालयातील श्री गणेशाची महापूजा करताना खजिनदार विष्णू कारमपुरी, याप्रसंगी रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, साक्षी आळगी, रमाताई ईपलपल्ली, वनिता कायत, काशिनाथ कोळी, कल्पना सल्ला, नागेश अंकम(पंतूलू) यांच्यासह भाविक भक्त छायाचित्र दिसत आहेत.