... ते फक्त आपलं अस्तित्व टिकण्यासाठी झगडत आहेत : डॉ. किरण देशमुख

shivrajya patra

सोलापूर : काँग्रेसकडे आता काही राहिलं नाही. विरोधकांचा मूळ अजेंडा काही नाही, ते फक्त आपलं अस्तित्व टिकण्यासाठी झगडत आहेत. सोलापुरातील प्रत्येक मतदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी उभा आहे, असा विश्वास भाजप युवा मोर्चा नूतन शहराध्यक्ष डॉ. किरण देशमुख यांनी व्यक्त केला.

भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शहर कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांची भाजप युवा मोर्चा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

या निवडीनंतर भाजप पदाधिकारी आणि आनंद कोलारकर मित्र परिवाराच्या वतीने डॉ. देशमुख यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

यावेळी बोलताना डॉ. देशमुख यांनी प्रारंभी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचे आभार मानले. केंद्रातील आणि राज्यातील भाजपच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू, असा विश्वास व्यक्त करताना, भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रीय हितासाठी काम करत असतो, असेही डॉ. देशमुख यांनी म्हटले.

याप्रसंगी सोलापूर शहर उत्तर पश्चिम मंडल अध्यक्ष देविदास बनसोडे, उत्तर पूर्व मंडल अध्यक्ष प्रथमेश आनंदकर, शहर चिटणीस शेखर फंड, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप जाधव, शिवराज झूंजे, हरिभाऊ झडकर, नागेश रामपूरे आदी उपस्थित होते.
To Top