बँकलोनवर सह्या कर अन्यथा तुझी डिग्री सर्टिफिकेट जाळून टाकतो; चौघांविरुध्द गुन्हा दाखल

shivrajya patra
                    (प्रतिकात्मक छायाचित्र)
सोलापूर : सासरी नांदत असताना सासरच्या मंडळींनी संगनमताने सौ. दिपीका हिचा शारीरिक व मानसिक त्रास दिला. हा प्रकार गेली ४ वर्षे सातत्याने घडला. तिने माहेरकडून ५० लाख रुपये आणावेत, अथवा बॅंक लोनवर सह्या न केल्यास तिचे डिग्री सर्टिफिकेट जाळून टाकण्याची धमकी दिल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर सासरच्या चौघाविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या अक्कलकोट रस्त्यावरील गांधी नगरात वास्तव्यास असलेल्या सौ. दिपीकाला, तिचा पती, सासू-सासरा आणि दिर 'तू वांजोटी आहेस' असे म्हणत टोमणे मारुन, शिक्षणसाठी बँक लोन काढून दे, असा तगादा लावून नोव्हेंबर २०१९ पासून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. तिच्याकडे माहेरुन ५० लाख रुपये आणुन दे असा तगादा लावून, तू जर बँकलोनवर सह्या नाही केली, तर तुझी डिग्री सर्टिफिकेट जाळून टाकतो, अशी धमकी देण्यात आली.

तिच्या मार्केट यार्ड पुणे, पी एन बी बँक अंकाऊंटमधून सासरच्या मंडळींनी, ५ एप्रिल २०२३ रोजी ५ लाख ५० हजार रुपये फिर्यादीस काही कल्पना न देता त्यांच्या स्वतःच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करुन घेतले. तिला उपाशी पोटी ठेऊन शारीरिक व मानसिक त्रास दिला. 

या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार पती प्रसाद गुंडु, सासरे प्रमोद गुंडू, सासू वंदना गुंडु आणि दिर प्रणव गुंडु (सर्व रा. २०१, गगन इनक्लुव, मार्केट यार्ड, पुणे) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
To Top