सोलापूर :
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी. विभाग (अजित पवार) यांच्या वतीने विविध कार्यक्षेत्रात चालक म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या कर्तुत्ववान चालकांचा चालक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचे प्रदेश सचिव संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
१७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या चालक दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोलापूर एस.टी. स्टँड येथे कर्तबगार एस.टी. चालक, पोलीस विभागातील कर्तबगार चालक व इतर मालवाहतूक करणारे वाहन चालवणारे चालक या अशा विविध सेवा बजविणाऱ्या चालकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचे प्रदेश सचिव संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ओ.बी.सी. कार्याध्यक्ष ईरफान शेख, अल्पसंख्यांक उत्तर विधासभा अध्यक्ष रियाज शेख यांनी केले होते.
याप्रसंगी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक विकास देशमुख तसेच एस.टी. बस आगारातील आगार प्रमुखांचीही उपस्थिती होती. यावेळी प्रांतिक सदस्य महेश निकंबे, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख, महिला कार्याध्यक्ष लता ढेरे, सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रमोद भोसले, पर्यावरण विभागाचे सोमनाथ शिंदे, ईमरान शेख, अजहर पठाण, लहु गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.