मुंबई :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रविवारी प्रबोधनकार ठाकरे आणि द्रविड आंदोलनाचे प्रणेते पेरियार रामास्वामी नायकर यांनाही त्यांच्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या.
'द बॉस'
'विश्वगुरू'
'वैश्विक नेत्तृत्व'
'नव्या आणि आत्मनिर्भर भारताचे शिल्पकार आमचे नेते मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या संपूर्ण महाराष्ट्रातर्फे कोटी कोटी शुभेच्छा आणि सलाम !' या शब्दात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना, Wishing PM Narendra Modi a happy birthday. अस आपल्या ट्विटर हँडलवर लिहून शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत, 'आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ह्याच सदिच्छा' या शब्दात शुभेच्छा दिल्या.
अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी सत्याग्रह करून, सर्व जातींना मंदिर प्रवेश असावा यासाठी प्रयत्न करणारे, समाजातील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था आणि पुराणमतवादी विचारांच्या विरोधात लढा उभारणारे, व त्यामुळे सनातनी कधीच पाय रोवू शकले नाही द्रविड आंदोलनाचे प्रणेते, पेरियार रामास्वामी नायकर यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी विनम्र अभिवादन..! केलंय.