सोलापूर : डॉ. आंबेडकर स्टुडंस् युथ असोसिएशनच्या वतीने शनिवारी, ०९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संस्थापक उत्तमभैय्या नवघरे यांच्या अध्यखतेखाली होत असलेल्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. आंबेडकर स्टुडंस् युथ असोसिएशन, सोलापूर यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.
सोलापुरातील सात रस्ता परिसरात, हॉटेल सेंटर पॉईंट येथे होत असलेल्या आजी-माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मेळाव्याची सुरूवात भारतीय सविधांनातील उद्देशिकाचे वाचन करून व संविधान संवर्धन, प्रचार व प्रसार करण्याची शपथ घेऊन करण्यात येणार आहे. यावेळी अर्जुनदादा सलगर, माजी नगरसेवक बबलु गायकवाड, हसीब नदाफ, संजय जोगीपेठकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांचे विद्यावेतन, नेहरू वसतीगृह, शिक्षण शुल्क समिती, खाजगी शिकवणी, हायस्कूल व महाविद्यालय परिसरात रोड-रोमियोकडून विद्यार्थीनींची होत असलेली छेडछाड, दामिणी पथक हे कार्यरत नसल्यामुळे विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान, शासन व प्रशासनाने नोंद, विद्यालय व महाविद्यालय परिसरात मटका, गुटखा व गांजा युक्त झाला आहे. या गंभीर प्रश्नाकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष वेधून तात्काळ कारवाई करावी, असे ठराव मांडण्यात येणार आहे.
सदर मेळाव्यामध्ये डॉ. आंबेडकर स्टुडंस् असोसिएशन मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर येथील तालुक्याचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर युथ असोसिएशनच्या शहर अध्यक्ष पदाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे.
सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रविण चाफा कारंडे, सोहेल शेख, ऋषिकेश मनलोर, शशिकांत भडकुंबे, किरण पारवे, आतिक अरब, शेखर बंगाळे इत्यादी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.