गणेशोत्सवानिमित्त मनपा क्षेत्रात मंडप/पेंडॉल तपासणी

shivrajya patra


तपासणी पथकास सहकार्य करण्याचे आवाहन

सोलापूर/१५ : सोलापूर शहरामध्ये सुमारे १, २०० गणोत्सवाकरीता मंडप/पेंडॉलचे परवाने सोलापूर महानगरपालिका यांचेकडून वितरीत होतात.  महापालिका क्षेत्रामध्ये आगामी गणेशोत्सवाचे अनुषंगाने उभारण्यात येणाऱ्या मंडप/ पेंडॉल तपासणी करण्यासाठी एकूण 8 विभाग निहाय मंडप/पेंडॉल  तपासणीकामी पथकाची नियुक्‍ती करणेत आलेले आहे.  पथकाकडून मंडप/पेंडॉलची तपासणी करण्यात येणार आहे. पथकावर नियंत्रण ठेवणेकामी नियंत्रण पथकाची नियुक्‍ती करीत असलेबाबत सूचना दिलेल्या आहेत.
सदर नियंत्रण  पथकामध्ये महसूल विभागातील तहसिलदार, पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक/सहा. पोलीस निरीक्षक, सोलापूर महानगरपालिकेतील सहा. आयुक्त, तसेच महावितरण मधील अधिकारी यांचा समावेश करण्यात आलेला असल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्र. १ यांनी कळविले आहे.


नियंत्रण पथकाकडून आगामी गणेशोत्सवाचे अनुषंगाने मंडप/पेंडॉलचे अचानकपणे तपासणी करण्यात येणार आहे. सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळ/संघटनांना तसेच नागरीकांना सदर मंडप/पेंडॉल तपासणी कामी आलेले पथकास सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्र. १ यांनी केलेले आहे.
To Top