सोलापूर/१५ : महाराष्ट्र शासनाच्या ध्येयधोरणानुसार कोशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महास्वयम या पोर्टलच्या विविध लाभार्थी घटक (स्टेक होल्डर्स) जसे उमेदवार (उद्योजक/नियोक्ते इत्यादी यांना या संकेत स्थळावर नोंदणी करणे, नोंदणीचे अद्ययावती करण करणे, रिक्तपदास अनुसरुन अप्लाय करणे, राज्यातील युवक व विद्यार्थी यांना करिअर विषयक संधीची माहिती, रोजगार मेळावे व रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम आहेत.
यामध्ये इच्छूकता दर्शविणे, विविध प्रशिक्षण संस्था, स्टार्टअप इ. विविध ऑनलाईन सेवा सुविध उपलबध करुन देण्यात आलेल्या आहेत. या ऑनलाईन सेवा घेतांना लाभार्थी घटकांना येणा-या अडचणी/तक्रारींची निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री हेल्पलाईन अंतर्गत १८ ऑगस्ट २०२३ पासून हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक १८००१२०८०४० असा आहे.
या हेल्पलाईनची वेळ सकाळी ८.०० ते रात्री ८.०० पर्यंत वाजेपर्यंत अशी आहे. याचा लाभ उमेदवार व उद्योजक यांनी घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त एच. एस. नलावडे यांनी केले आहे.