युवा महोत्सवामध्ये लोककलेला आश्रय मिळाल्याने प्रभारी कुलगुरू डाॅ. रजनिश कामत यांचा सत्कार

shivrajya patra


सोलापूर : गेल्या पाच वर्षाच्या प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर, सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये तात्काळ लोककलेला आश्रय मिळवून दिल्याबद्दल विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये युवा पँथर विद्यार्थी आणि सामाजिक संघटनेकडून तसेच युवा महोत्सव परिवाराच्यावतीने पॅंथर आतिश बनसोडे यांच्या हस्ते प्रभारी कुलगुरू डाॅ. रजनिश कामत यांचा मानाचा फेटा, पुष्पगुच्छ आणि पंचशील उपरणे घालून सत्कार करण्यात आला.सदर सत्कार हा संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या वतीने डॉ. रजनिश कामत यांनी स्विकारला. 

सत्कारास उत्तर देताना डॉ. रजनिश कामत यांनी, 'हा सत्कार माझ्या एकट्याचा नसून समस्त व्यवस्थापन समितीचा आहे ', असे सांगत आभार व्यक्त केले.

यावेळी विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सर्व सभासद आणि पॅंथर परिवाराचे सुकांत वाघमारे, अमित गायकवाड, स्टडीज्युस इंडियाचे संचालक सुमित डोंगरे, विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि मुंबई पोलीस राहुल बनसोडे, रोहन चौगुले आदी पँथर परिवार उपस्थित होता.
To Top