ऐतिहासिक वारसा स्थळांवर परकीय ब्राह्मणांचा जबरदस्तीने ताबा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चाची रॅली

shivrajya patra


सोलापूर : या देशातील मूलनिवासींच्या इतिहास व ऐतिहासिक वारसा स्थळांवर परकीय ब्राह्मणांच्या वतीने जबरदस्तीने कब्जा केला जात असल्याच्या विरोधात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या निमित्ताने सोलापूर शहरात रॅली काढून 'त्या' प्रयत्नाचा विरोध दर्शविला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करीत त्या कृतिचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या आवाहनानुसार देशातील ३१ राज्ये, ५६७ जिल्ह्यात एकाच वेळी साखळीबध्द आंदोलन करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या चरणाचा प्रारंभ ०८ ऑगस्ट रोजी देशातील सर्व जिल्हास्थळी आंदोलने करून निवेदने देण्यात आली होती. दुसऱ्या चरणात, १५ ऑगस्ट रोजी सर्व जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यात करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात २२ ऑगस्ट रोजी सर्व जिल्हा मुख्यालयावर रॅली प्रदर्शन आंदोलन करण्यात आले.

चौथ्या टप्प्यात शनिवारी, ०९ सप्टेंबर रोजी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भारत बंद चे आवाहन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर येथे रॅली काढून त्या ब्राह्मणी प्रयत्नांना विरोध प्रदर्शित करण्यासाठी निदर्शने करण्यात आली.

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या अभ्यास व डीएनए पुराव्याच्या आधारे ब्राह्मण विदेशी आहेत, ते भारताच्या कोणत्याही भूभागावर कब्जा करू शकतात, असा त्यांचा सवाल आहे. बुद्धगया ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालीच पाहिजे, काशी-मथुरा हे बौद्ध स्थळ असून ब्राह्मणांच्या कब्जातून मुक्त करण्यात यावे, सोमनाथ मंदिराखाली बौद्ध स्तूप बौद्धांच्या ताब्यात दिली पाहिजे, साकेत बौध्द संस्कृतीचे वारसा स्थळ आहे. महाबोधी महाविहारावरील विदेशी ब्राह्मणांचा ताबा हटविण्यात यावा, आणि दिल्लीच्या जुन्या किल्ल्यात बौध्द अवशेष मिळाले आहेत, अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

 या सर्व विषयाला आधारून आमची वारसा स्थळे आम्हाला मिळाली पाहिजे, त्या आमच्या ऐतिहासिक वारसा स्थळांचं जतन झालं पाहिजे, अशाही मागणी मांडण्यात आली. पाचव्या टप्प्यात, २४ सप्टेंबर रोजी वाराणसी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाख लोकांचा मोर्चा निघणार आहे. सहाव्या टप्प्यात, २७ सप्टेंबर रोजी मथुरा जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंचा मोर्चा नेण्यात येईल. सातव्या टप्प्यात, २६ नोव्हेंबर रोजी बौध्द गया येथे राष्ट्रीय स्तरावरील विशाल महारॅली निघणार असल्याचेही यावेळी सांगितले. 


To Top