सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रकटीकरण पथकाला मंदिरात चोरी करणाऱ्या 'चौकडी ' पैकी 'त्रिकूटा' ला गजाआड करण्यात यशस्वी झाले. त्या त्रिकुटाला गजाआड केल्यावर त्यांनी ०६ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून १ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस पथक पलायन करण्यात यशस्वी झालेल्या चोरट्याच्या मागावर असून त्यास गजाआड गेल्यावर अन्य गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता पोलीस निरीक्षक राजेंद्र माने यांनी व्यक्त केली आहे.
सोलापूर शहरात होत असलेल्या घरफोड्या, वाहन व मोबाईल चोरी या घटना नित्याच्या आहेत. अशा गुन्ह्यांत आरोपींना गजाआड करून त्यावर पाय बंद घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने, ०६ सप्टेंबर रोजी पोहेकॉ/७४५ दिपक डोके यांना मिळालेल्या खबरीनुसार निलम नगर भागातील मंदिरात चोरी करून दक्षिणा पेटी फोडलेले ४ संशयित स्वागत नगरातील शांतीनगर चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्याअनुषंगाने पोसई/विक्रम रजपूत व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार यांनी सापळा लावून, चौकडीला ताब्यात घेत असताना त्यातील १ आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. उर्वरित ३ संशयीतांना ताब्यात घेऊन गजाआड करण्यात यश आले. ते तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडे पोलीस कोठडीदरम्यान कसून चौकशी केली,असता त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे येथील तीन, विजापूर नाका पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे तसेच वळसंग पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे केले असल्याची गुन्हे केल्याची कबूली दिली आहे. या गुन्ह्यांमध्ये मंदिर चोरी, घरफोडी, मोटार सायकल व मोबाईल चोरी अशा गुन्ह्यांचा समावेश असल्याचे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.
उघडकीस आलेल्या ०६ गुन्ह्यामध्ये या चौकडीने एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील निलम नगर भागातील मंदिरातील दक्षिणा पेटी फोडून पळवून नेली, असल्याचीही कबुली दिली. आरोपीतांकडून रोख रक्कम, मोटार सायकल व मोबाईल असा एकुण १,७२,१००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चौथ्या आरोपीच्या अटकेनंतर त्याची व्याप्ती वाढणार असल्याची शक्यता असल्याचे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त (परि.) विजय कबाडे, सहा.पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने, पोनि शिवशंकर बोंदर यांचे मार्गदर्शनाखाली पोसई विक्रम रजपूत, पोहेकॉ/१२७ राकेश पाटील, पोहेकॉ/६२५ एकनाथ उबाळे, पोहेकॉ/७४५ दिपक डोके, पोहेकॉ/१२६६ सचिन भांगे, पोना/२७३ मंगेश गायकवाड, पोकॉ/१४६७ शैलेश स्वामी, पोकॉ/१६६४ अमोल यादव, पोकॉ/१६१८ सुहास अर्जुन, पोकॉ/१४८३ काशिनाथ वाघे, पोकॉ/१५८७ शंकर याळगी, पोकॉ/४०२ अमसिध्द निंबाळ, पोकॉ/१७३ देविदास कदम, पोकॉ/१४६९ दिपक नारायणकर यांनी पार पाडली.