डॉ. हारून रशीद बागवान यांना राष्ट्रीय पुरस्कार

shivrajya patra

सोलापूर : एम. ए. पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्सचे प्राचार्य डॉ. हारून रशीद अहमद बागवान यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन नुकताच राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. 

त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील 'ॲवॉर्ड ऑफ एक्सलन्स- २०२३' हा पुरस्कार देण्यात आला. 

या यशाबद्दल मुख्तार पेरमपल्ली, कुरेशी सर, साहिर नदाफ, राजा बागवान सर, डॉ. सुरैय्या जहागीरदार, महंमद अली शेख सर, वसीम नल्लामंदू, निकहत नल्लामंदू, झाकीर शाहपुरे, फरजाना नदाफ, अल्ताफ सिद्दीकी सर, इद्रिस पेरमपल्ली, मोहसीन माशाल, मेहमूद खतीब, युसूफआलम सिद्दीकी, सादिक बागवान यांनी त्यांचे अभिनंदन केले.
To Top