छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकरण फलकांचे अनावरण

shivrajya patra

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या हस्ते शनिवारी, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकरण फलकांचे अनावरण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर महसुली विभागासह जिल्हा, उपविभाग, तालुका, गावाचे आणि धाराशिव जिल्हा, उपविभाग, तालुका, गावाचे नामकरण करण्यात आले आहे.
राज्य शासनाने यासंबंधीचा अद्यादेश शुक्रवारी, १५ सप्टेंबर रोजी जारी केला होता. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकरण फलकांचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे २ दिवस छत्रपती संभाजीनगरात असून राज्य मंत्रिमंडळाची बैठक स्मार्ट सिटी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. दुपारी बैठकीय प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर विभागाच्या सरकार झोळीत काय टाकतंय, याची मराठवाड्यातील जनतेला उत्सुकता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध प्रकल्प, इमारतींचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. सातारा व देवळाई परिसरातील मलनि:स्सारण योजनेचे भूमिपूजन तर हर्सूल येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या लोकार्पणाचा यात समावेश आहे.
यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top